शैक्षणिक
स्पर्धा परीक्षेतील यश हे केवळ प्रामाणिक व सातत्यपूर्ण कष्टानेच शक्य - मा.श्री. प्रणिल गिल्डा (उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज)
By nisha patil - 12/31/2025 1:14:57 PM
Share This News:
स्पर्धा परीक्षेची तयारी विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडवते. प्रचंड संघर्षाने मिळवलेले पद हे तुम्हाला आर्थिक स्थैर्य तर देतेच पण काम करण्याचे अत्यंतिक समाधान सुद्धा देते. केवळ प्रामाणिक व सातत्यपूर्ण कष्टाने स्पर्धा परीक्षेत निर्विवाद यश मिळवता येतं, फक्त परीक्षार्थींनी आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास का करत आहोत या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वतःकडून घेऊनच अभ्यासाला सुरुवात करावी. असे प्रतिपादन श्री.ए.आर. तांबे सर संचलित, श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्विसेस आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्राप्रसंगी मिरज शहर पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा.श्री. प्रणिल गिल्डा यांनी व्यक्त केले.
उपस्थित दुसरे प्रमुख मार्गदर्शक मा.श्री.विशाल पाटील (कर सहाय्यक, विक्रीकर विभाग, कोल्हापूर) या प्रसंगी म्हणाले, आपल्या निर्णयावर ठाम विश्वास, आपल्या ध्येयावरील अतूट श्रद्धा, व सातत्यपूर्ण प्रयत्नासोबतच एक उत्तम मार्गदर्शक यश प्राप्तीसाठी आवश्यक असतो. श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्विसेस हे एक प्रभावी मार्गदर्शन केंद्र म्हणून हजारो कर्तव्यदक्ष अधिकारी घडवत राहतील.
आजच्या स्पर्धेच्या काळात अचूक व परीक्षाभिमुख मार्गदर्शन केंद्र उभे करून, अत्यंत सूत्रबद्धरीत्या सर्व विषयांच्या नोट्स, डिजिटल क्लासरूम, विकली टेस्ट, शिस्तबद्ध श्रद्धा लायबरी, चालू घडामोडीचे बुकलेट,व खास स्पर्धा परीक्षेसाठी वेगळा प्रशस्त कॅम्पस निर्माण करून इचलकरंजी शहरामध्ये सामान्य कुटुंबातून अधिकारी घडवण्याचे आमचे स्वप्न असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष श्री.ए.आर तांबे सरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या व्यवस्थापकीय सदस्या, सौ. सुप्रिया कौंदाडे मॅडम, सौ.संगीता पवार मॅडम , श्री.अभिषेक तांबे सर, सौ. सृष्टी तांबे मॅडम , श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हील सर्विसेस मधील सर्व प्राध्यापक, कर्मचारी वृंद, व इन्स्टिट्यूट सहित स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षेतील यश हे केवळ प्रामाणिक व सातत्यपूर्ण कष्टानेच शक्य - मा.श्री. प्रणिल गिल्डा (उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज)
|