बातम्या
बुद्धी आणि कौशल्यांच्या जोरावर यश नक्की – कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा
By nisha patil - 10/9/2025 5:42:04 PM
Share This News:
बुद्धी आणि कौशल्यांच्या जोरावर यश नक्की – कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा
कोल्हापूर : नवतंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच उत्तम कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. मानवी मेंदू एवढे प्रगत तंत्रज्ञान नाही. त्यामुळे स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून संशोधन व कौशल्य आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी केले.
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या ‘दीक्षारंभ’ स्वागत समारंभात ते बोलत होते.
🎓 समारंभात उपस्थित मान्यवर
कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक प्रा. अभय जोशी, संचालक प्रा. डॉ. अजित पाटील, विभाग प्रमुख प्रा. अभिजीत मटकर, प्रा. अश्विन देसाई आदी उपस्थित होते.
✨ ९८.५५ पर्सेंटाईल मिळवून डाटा सायन्समध्ये प्रवेश घेतलेल्या सिद्धी राजपूत हिचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
🔹 डॉ. शर्मा म्हणाले – “विद्यार्थी हीच खरी संपत्ती असून त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे हेच संस्थेचे ध्येय आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात बहुशाखीय व गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत स्वतःच्या बुद्धीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.”
🔹 डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले – “जीवनात तीन वेळा दीक्षारंभ होतो – जन्मावेळी, शाळेत आणि कॉलेजमध्ये. आता प्रोफेशनल एज्युकेशनचा टप्पा सुरू होत आहे. विद्यार्थ्यांनी मेंदूचा पुरेपूर वापर करावा.”
🔹 डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी संस्थेच्या स्थापनेपासून विस्तारापर्यंतचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांवर विश्वास व्यक्त केला.
📊 संस्थेची वैशिष्ट्ये
-
नॅक ए++ मानांकन
-
एनआरएफ 150 रँक
-
QS I-Gauge डायमंड मानांकन
-
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार
-
अनुभव व प्रयोगात्मक शिक्षणावर भर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अजित पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मारुती देवकर यांनी तर आभार प्रा. अभिजीत मटकर यांनी मानले.
बुद्धी आणि कौशल्यांच्या जोरावर यश नक्की – कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्माबुद्धी आणि कौशल्यांच्या जोरावर यश नक्की – कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा
|