शैक्षणिक

किसान क्वेस्ट’मध्ये डी. वाय. पाटीलच्या विद्यार्थ्यांचे यश

Success of D Y Patils students in Kisan Quest


By nisha patil - 1/23/2026 3:20:25 PM
Share This News:



किसान क्वेस्ट’मध्ये डी. वाय. पाटीलच्या विद्यार्थ्यांचे यश

‘वज्र’ उपकरणाला राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक

 भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत पुणे येथे झालेल्या ‘किसान क्वेस्ट’ राष्ट्रीय स्पर्धेत डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या ‘वज्र’ या वन्यप्राणी प्रतिबंधक उपकरणाने प्रथम क्रमांक पटकावला.
६०० संघांतून ‘टीम वज्र’ अव्वल

देशभरातील ६००हून अधिक संघांमध्ये यश पेटकर, राजऐश्वर्या सावंत व वेदांत चिलबुले (टीम वज्र) यांनी डॉ. अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपकरण विकसित केले. या यशाबद्दल त्यांना ६० हजार रुपयांचे रोख पारितोषिक तसेच ‘किसान प्रदर्शन २०२५’मध्ये “फार्मर्स चॉईस अवॉर्ड” देऊन गौरविण्यात आले.शेतकऱ्यांसाठी उपयुक्त नाविन्य
वन्यप्राणी जवळ येताच कंपन ओळखून आवाज, धूर व तीव्र प्रकाशाच्या साहाय्याने प्राणी पळवून लावणारे हे उपकरण शेतकरी व ग्रामीण भागासाठी मोठा दिलासा देणारे ठरणार आहे.या यशाबद्दल विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, रजिस्ट्रार डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


किसान क्वेस्ट’मध्ये डी. वाय. पाटीलच्या विद्यार्थ्यांचे यश
Total Views: 27