बातम्या
महाराष्ट्राच्या सौर ऊर्जा योजनांचे यश इतर राज्यांसाठी आदर्श — केरळचे अपर मुख्य सचिव
By nisha patil - 8/13/2025 4:52:18 PM
Share This News:
महाराष्ट्राच्या सौर ऊर्जा योजनांचे यश इतर राज्यांसाठी आदर्श — केरळचे अपर मुख्य सचिव
मुंबई | १३ ऑगस्ट २०२५ — गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्रात महावितरणने सौर ऊर्जेच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून वीजदर कपात, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा आणि घरगुती ग्राहकांना दिलासा दिला आहे. हे यश इतर राज्यांसाठी आदर्श असल्याचे मत केरळचे अपर मुख्य सचिव (ऊर्जा) पुनीत कुमार यांनी महावितरण मुख्यालय भेटीदरम्यान व्यक्त केले.
अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी २०३० पर्यंत ३८ हजार मेगावॅट हरित ऊर्जा, ₹३.३ लाख कोटी गुंतवणूक, ७ लाख रोजगार व ८२ हजार कोटींची वीज खरेदी बचत होणार असल्याची माहिती दिली. महावितरण प्रमुख लोकेश चंद्र यांनी सांगितले की, देशातील सर्वाधिक ५.१२ लाख सौर कृषीपंप महाराष्ट्रात कार्यान्वित आहेत व १६ हजार मेगावॅट क्षमतेचा मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० प्रकल्प पूर्णत्वास जात आहे.
पुनीत कुमार यांनी महाराष्ट्राच्या कमी कालावधीत झालेल्या सौर प्रगतीचे कौतुक करत केरळमध्येही सौर ऊर्जेवर अधिक भर देण्याचा संकेत दिला.
महाराष्ट्राच्या सौर ऊर्जा योजनांचे यश इतर राज्यांसाठी आदर्श — केरळचे अपर मुख्य सचिव
|