बातम्या
सामाजिक वनीकरण विभागामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धामध्ये उर्दू हायस्कुलच्या विद्यार्थीनींचे यश
By nisha patil - 10/14/2026 5:56:04 PM
Share This News:
सामाजिक वनीकरण विभागामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धामध्ये उर्दू हायस्कुलच्या विद्यार्थीनींचे यश
*आजरा(हसन तकीलदार):-कोल्हापूर जिल्हा वनविभाग सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून वन्यजीव संरक्षण, संवर्धन आणि पर्यावरण जागृतीच्या उद्देशाने चित्रकला आणि निबंध स्पर्धा डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कुल आजरा येथे आयोजित करणेत आल्या होत्या. त्या स्पर्धाचे निकाल आता जाहीर करून विजेत्यांना सन्मानित करणेत आले.
विकासाच्या नावावर पर्यावरणाला भकास केले जात आहे. प्रगतीच्या नावावर मानवी जीवन अधोगतीकडे जात आहे. विकासाच्या नावावर शेकडो वर्षांच्या दुर्मिळ झाडांची बेसुमार कत्तल केली जात आहे. जंगलाना उजाड आणि भकास केले जात आहे. वन्य प्राण्यांच्या अधिवासापर्यंत मानव पोहचला आहे त्यामुळे वन्यजीव मानवी वस्तीपर्यंत पोहचत आहेत. निसर्गाचा प्रकोप वाढत आहे. अवर्षण, अतिवृष्टी तसेच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. याबाबत जनजागृती होणे काळाची गरज बनली आहे. यासाठीच इयत्ता 8 वी ते 10 वी च्या गटासाठी चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धाचे निकाल नुकतेच जाहीर करणेत आले. चित्रकला स्पर्धेत युसरा बुड्डेखान प्रथम क्रमांक,सादिया माणगावकर दुसरा आणि नौसीन बुड्डेखान तिसरा क्रमांक पटकावला. निबंध स्पर्धेत आयेशा माणगावकर प्रथम क्रमांक, सानिया जंगी दुसरा क्रमांक तर खदिजा आगा हिने तिसरा क्रमांक पटकावला. या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करणेत आले. यावेळी सामाजिक वनिकरण विभाग गडहिंग्लजचे वनपाल एस. के. निळकंठ, वनपाल श्रीमती एस. एस. पत्की, वनपाल एच. एम. शेलार, वनरक्षक डी. ए. कदम तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशवंत गुणवंत विद्यार्थिनींच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
सामाजिक वनीकरण विभागामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धामध्ये उर्दू हायस्कुलच्या विद्यार्थीनींचे यश
|