बातम्या

विवेकानंद मध्ये ‘जिओ-फेस्ट २०२६’ चे यशस्वी आयोजन

Successful organization of Geo Fest 2026


By nisha patil - 1/31/2026 4:31:11 PM
Share This News:



विवेकानंद मध्ये ‘जिओ-फेस्ट २०२६’ चे  यशस्वी आयोजन

कोल्हापूर, दि. 31  :  विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर मधील भूगोल विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने ‘जिओ फेस्ट २०२६’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी भूगोल विषयातील सखोल ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन गटांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्याच दिवशी सायंकाळी हौशी खगोल अभ्यासक श्री. अनिल गवळी याचे ‘विश्वाचा पसारा’ या विषयावर व्याख्यान झाले व त्यानंतर सायंकाळी ७ ते ९ या वेळेत आकाश निरीक्षण (Sky- Watch) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमासाठी बहुसंख्य विद्यार्थी, पालक, संशोधक व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी क्वान्टोक्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री. शुभम यादव यांच्या ‘अवकाश संशोधन व सुदूर संवेदन क्षेत्रातील संधी’ या व्याख्यानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांचा तसेच पदवी व पदव्युत्तर वर्गातील उच्च श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे सचिवा मा. प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मा. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

प्राचार्य डॉ. संजय थोरात व आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. श्रुती  जोशी  यांच्या  नेतृत्वाखाली

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे संयोजक व पी. जी. समन्वयक डॉ. एच. पी. पाटील, कार्यशाळा समन्वयक डॉ. शुभांगी काळे, विभागप्रमुख डॉ. जी. एस. उबाळे तसेच डॉ. निशा सुर्वे, डॉ. सिद्धार्थ घोडेराव, डॉ. विठ्ठल पाटील, सागर पवार, आर्या जोशी, वैशाली पालकर, व अश्विनी मुरवणे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमात डॉ. बापुजी साळुंखे इंजिनिअरिंग इंस्टीट्युटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, फोटोग्राफी विभाग प्रमुख श्री. रवी सुतार तसेच महाविद्यालयातील इतर विषयांचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागातील विद्यार्थिनी कु. प्रतिमा हजारे व कु. धनश्री नांगरे यांनी केले. तांत्रिक सहाय्य श्री. नामदेव माने, श्री. राम बोंगे यांनी केले.


विवेकानंद मध्ये ‘जिओ-फेस्ट २०२६’ चे यशस्वी आयोजन
Total Views: 141