बातम्या

जिल्हाभर फेरफार अदालतीचे यशस्वी आयोजन एका दिवसामध्ये एकूण 1487 फेरफारांची निर्गती

Successful organization of district wide

By nisha patil - 9/24/2025 3:38:47 PM
Share This News:

जिल्हाभर फेरफार अदालतीचे यशस्वी आयोजन एका दिवसामध्ये एकूण 1487 फेरफारांची निर्गती
 
कोल्हापूर, : जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून महसूल प्रशासनाचे वतीने सेवा पंधरवडा निमित्ताने दिनांक 23 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकारी स्तरावर फेरफार अदालत आयोजित करणेत आलेली होती. या फेरफार अदालतीमध्ये जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. आयोजित उपक्रमामध्ये मंडळ अधिकारी स्तरावरील प्रमाणीकरणासाठी उपलब्ध 951 अनोंदणीकृत फेरफार व 503 नोंदणीकृत  फेरफार अशा एकूण 1454 साध्या फेरफार नोंदी निर्गत करणेत आल्या. 

तसेच 33  तक्रार नोंदीवर मंडळ अधिकारी यांनी निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे एकूण  1487 फेरफार निर्गत करणेत आल्या आहेत. या फेरफार अदालत उपक्रमाबाबत शेतकरी खातेदार यांचेकडून समाधान व्यक्त करणेत आले.

जिल्हाभर फेरफार अदालतीचे यशस्वी आयोजन एका दिवसामध्ये एकूण 1487 फेरफारांची निर्गती
Total Views: 82