बातम्या
आजरा ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वाथ्य कार्यक्रम अंतर्गत १० बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया.
By Administrator - 4/4/2026 3:30:16 PM
Share This News:
आजरा ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वाथ्य कार्यक्रम अंतर्गत १० बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया.
आजरा (हसन तकीलदार):- आजरा तालुक्यातील अंगणवाडी तसेच शालेय बालकांची सखोल आरोग्य तपासणी आर.बी.एस.के. पथकांमार्फत करण्यात आली होती. या तपासणीत शस्त्रक्रियेस पात्र ठरलेल्या बालकांसाठी आज दि.२५ मार्च २०२६ रोजी आजरा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये विशेष शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण १० बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली यामध्ये २ जिभेखालील बंध व ८ शिश्नचर्म रोगावरील शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
शस्त्रक्रीयातज्ञ डॉ.सुनील अभिवंत यांनी सर्व शस्त्रक्रिया कौशल्यपूर्णरीत्या पार पाडल्या भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. ज्योती कोले यांनी जबाबदारी सांभाळली, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरजित पांडव, डॉ. स्वाती रेडेकर, डॉ. शाहिद दरवाजकर, डॉ. मंदिरा सातवेकर यांनी विशेष परिश्रम घेतले .यावेळी होते.

आजरा ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वाथ्य कार्यक्रम अंतर्गत १० बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया.
|