बातम्या

सत्याचा विजय! भरारी पथकाने जप्त केलेले पैसे दुपारी परत — सुदर्शन कदम यांचा खुलासा...

Sudarshan kadam


By nisha patil - 11/30/2025 7:14:55 PM
Share This News:



सत्याचा विजय! भरारी पथकाने जप्त केलेले पैसे दुपारी परत — सुदर्शन कदम यांचा खुलासा...

निवडणूक आयोगाकडून तपासानंतर सुदर्शन कदम यांना रक्कम परत..

जप्त रक्कम आयोगाकडून परत; सुदर्शन कदमांची प्रतिक्रिया

जयसिंगपूर | जयसिंगपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर आज सकाळी भरारी पथकाने जप्त केलेली रक्कम निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दुपारी परत दिली. तपासात संबंधित रकमेचा संपूर्ण हिशोब आणि दस्तऐवज योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर यांनी जारी केलेल्या पत्रात (जा.क्र. सार्वत्रिक निवडणूक 457/2025, दिनांक 30/11/2025) म्हटले आहे की,

सकाळी 10 वाजता भरारी पथकाने सुदर्शन सदाशिव कदम यांच्या कुटुंबीयांच्या वाहनातून आढळलेल्या पैशाबाबत दिलेला खुलासा समाधानकारक असून निवडणूक संहितेचे उल्लंघन नसल्याचे निष्पन्न झाले.

या पार्श्वभूमीवर, सकाळी जप्त केलेली संपूर्ण रक्कम दुपारी परत करण्यात आली.

“सत्य परेशान होता है, लेकिन पराजित नहीं होता” — सुदर्शन कदम

जप्त केलेली रक्कम परत मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सुदर्शन सदाशिव कदम, जयसिंगपूर नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार म्हणाले:

 “सर्वसामान्य जयसिंगपूरवासीयांनी आपल्या घामाच्या कष्टातून मला देणगी स्वरूपात दिलेला पैसा भरारी पथकाने जप्त केला होता. परंतु पैशाचा पैशाचा हिशोब आयोगाला दिल्यानंतर त्यांनी रक्कम परत केली. हा सत्याचा विजय आहे.

जनता आणि स्वामींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे.”

जप्तीपासून परत मिळेपर्यंतच्या या घडामोडींमुळे जयसिंगपूर नगरपरिषद निवडणूक अधिकच तापली असून जनसंघर्ष विकास आघाडी, शिरोळ तालुका विकास आघाडी आणि जयसिंगपूर विकास पॅनलमध्ये याबाबत चर्चेचा विषय बनला आहे.


सत्याचा विजय! भरारी पथकाने जप्त केलेले पैसे दुपारी परत — सुदर्शन कदम यांचा खुलासा...
Total Views: 48