राजकीय

कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी गट प्रमुखपदी सुधीर देसाई यांची निवड

Sudhir Desai appointed as NCP group chief in Kolhapur Zilla Parishad


By nisha patil - 2/14/2026 1:15:35 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी गट प्रमुखपदी सुधीर देसाई यांची निवड 


आजरा(हसन तकीलदार) :- नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पेरणोली मतदार संघातून सुधीर देसाई यांनी दणदणीत विजय मिळविला. दोन्ही राष्ट्रवादी आणि उबाठा यांच्या एकीमुळे हा विजय सोपा झाला.आता सुधीर देसाई (नूतन जिल्हा परिषद सदस्य) यांची कोल्हापूर जिल्हा परिषद येथे राष्ट्रवादी गट प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या निवडीबद्दल हसन मुश्रीफ (वैद्यकीय शिक्षण मंत्री) यांचे विशेष आभार मानण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व विश्वासामुळेच ही जबाबदारी मिळाल्याची भावना व्यक्त यावेळी करण्यात आली.

यावेळी  संभाजी पाटील(उबाठा उपजिल्हाप्रमुख), अबुताहेर तकिलदार(चेअरमन शहीद अब्दुल हमीद विकास सोसायटी ) युवराज पोवार (तालुका प्रमुख उबाठा )व  राजू होलम यांनी सुधीर देसाई यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी गट अधिक प्रभावीपणे काम करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासकामांना गती देणार त्याचप्रमाणे मतदार संघाच्या गावागावा पर्यंत विकासाची गंगा आणणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सुधीर देसाई यांनी सर्वांचे आभार मानत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याचप्रमाणे भविष्यातही अशीच साथ देण्याचे आवाहन केले.


कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी गट प्रमुखपदी सुधीर देसाई यांची निवड
Total Views: 556