बातम्या

सुधीरभाऊंची वचनपूर्ती... दिलेला शब्द पाळला

Sudhirbhau


By nisha patil - 5/25/2026 9:55:08 PM
Share This News:



**सुधीरभाऊंची वचनपूर्ती... दिलेला शब्द पाळला*

**आजरा(हसन तकीलदार)*:-निवडणूक काळात पंचायत समिती सदस्य पदाचे उमेदवार सौ.यशोदा पोवार आणि जिल्हा परिषद सदस्य पदाचे उमेदवार सुधीरभाऊ देसाई यांनी प्रचारादरम्यान जनतेला काही आश्वासने आणि शब्द दिला होता . त्यावेळी सुधीर भाऊंनी म्हटले होते की,"मला निवडून द्या, माझ्या हक्काचा आणि अधिकाराचा पहिला निधी हा आपल्या धनगरवाड्याच्या विकासासाठीच वापरला जाईल,"

दिलेला शब्द कधीही न विसरणाऱ्या सुधीरभाऊंनी आज त्याची प्रचिती धनगरवाड्यावरील बांधवांना दिली!

 धनगरवाड्यावर मोठ्या उत्साहात, ग्रामस्थांच्या साक्षीने आणि वाड्यावरील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून विकासकामांचा जाहीर शुभारंभ करण्यात आला.यावेळी सुधीरभाऊंनी सांगितले की राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतं असतं, पण विकास आणि दिलेला शब्द हा पाच वर्षांसाठी असतो. धनगरवाड्याच्या माऊलींनी आणि तरुणांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याची परतफेड मी कामाच्या माध्यमातूनच करणार.

केवळ निवडणुका जिंकण्यापुरत्या पोकळ घोषणा न करता, विजयानंतर पहिला निधी थेट वाड्याच्या विकासासाठी खर्ची घालून सुधीरभाऊंनी आपल्या 'शब्दप्रमाण' नेतृत्वाची ओळख पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.जे ठरलंय ते करणार हेच सुधीरभाऊंचे तत्व असल्यामुळे ते जिल्ह्यापर्यंत पोहचले आहेत.

या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती उपसभापती सौ. यशोदा पोवार, स्व. राजारामबापू देसाई फाऊंडेशनचे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते वृषाल आण्णा हुक्केरी, बाजार समितीचे संचालक युवराज पोवार, बांधकाम विभागाचे प्रमुख नाईक साहेब, आजी माजी सरपंच तसेच धनगरवाड्यावरील सर्व अबालवृद्ध, माता-भगिनी आणि प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान भाऊंच्या पुढील प्रवासाला मोठी ऊर्जा देणारा ठरेल, यात शंका नाही.


सुधीरभाऊंची वचनपूर्ती... दिलेला शब्द पाळला
Total Views: 141