बातम्या
कोल्हापुरातील बैठकीत कारखानदारांची चुप्पी; आंदोलन अंकुशचा ठाम पवित्रा.....
By nisha patil - 10/30/2026 11:19:48 PM
Share This News:
ऊस दराचा तिढा कायम;....5000 हजार रुपये दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही!
कोल्हापुरातील बैठकीत कारखानदारांची चुप्पी; आंदोलन अंकुशचा ठाम पवित्रा.....
प्रतिनिधी . आचिन हेरवाडेऊस दराच्या प्रश्नावर कोल्हापुरात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत एकाही कारखानदाराने यंदा शेतकऱ्यांना किती ऊस दर देणार, याबाबत स्पष्ट भूमिका मांडली नाही. त्यामुळे बैठक होऊनही ऊस दराचा तिढा कायम राहिला असून, तोडगा कसा निघणार, असा सवाल आंदोलन अंकुश संघटनेने उपस्थित केला आहे.
बैठकीनंतर पुन्हा बैठक घेऊन तोडगा काढू, असे पालकमंत्री आबिटकर यांनी जाहीर केले. मात्र, ही बैठक कधी आणि कोणाबरोबर होणार, याबाबत स्पष्टता दिली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी एफआरपीपेक्षा अधिक दर द्यावा लागेल, असे सांगितले असले तरी एफआरपीवर किती वाढीव दर देणार, याचे उत्तर कारखानदारांनी दिले नाही.
याबाबत आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे म्हणाले, शेतकऱ्यांना परवडणारा दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, अशी ठाम भूमिका आम्ही बैठकीत मांडली आहे. मात्र, एक-दोन दिवसांत किरकोळ दरवाढ जाहीर करून कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. यंदाही शेतकऱ्यांचा ऊस कमी दरात घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडणार आहोत.
शेतकऱ्यांना परवडणारा दर मिळाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत कारखाने सुरू करू देणार नाही. शेतकऱ्यांनीही ऊस दर जाहीर होईपर्यंत ऊस तोडी स्वीकारू नयेत. आमचा निर्धार कायम आहे, असा इशारा धनाजी चुडमुंगे यांनी दिला.
कोल्हापुरातील बैठकीत कारखानदारांची चुप्पी; आंदोलन अंकुशचा ठाम पवित्रा.....
|