ताज्या बातम्या
साखर कामगार प्रतिनिधींचे पन्हाळा येथे शिबिर खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्याउद्घाटन
By nisha patil - 9/18/2025 12:35:29 PM
Share This News:
पन्हाळा:- (शहाबाज मुजावर) खासदार राज्यसभा, माजी केंद्रीय कृषी मंत्री भारत सरकार ,शरद पवार यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार आहे, तसेच त्यांच्याबरोबर आमदार जयंतराव पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, माजी सहकार मंत्री पी. आर. पाटील अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघ, मुंबई, पृथ्वीराज चेअरमन छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर-इंदापूर , गणपतराव आप्पासाहेब पाटील उपस्थित असणार आहेत.
केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे राज्यातील साखर कारखान्यांतील कामगारावर होणाऱ्या परिणामांवर चर्चा व उपाययोजनांबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी उद्या गुरुवारी दिनांक 18 सप्टेंबर 2025, सकाळी साडेदहा वाजता ,पन्हाळा येथे राज्य साखर कारखाना प्रतिनिधी मंडळातर्फे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर तीन सत्रात होणार आहे.
पहिल्या सत्रात त्याचे उद्घाटन माजी कृषिमंत्री व खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे, गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर आहे. यावर व्याख्यान होणार आहे.
दुसऱ्या सत्रात शनिवार दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी, या दिवशी कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार,प्रकाशराव आबिटकर असणार आहेत. त्यांच्याबरोबर,आमदार चंद्रदिप नरके मा. माजी आमदार कल्लाप्पाण्णा आवाडे, चेतनकुमार माळी,मुख्याधिकारी पन्हाळा गिरीस्थान नगरपालिका, पन्हाळा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ११ वाजता ,अँड. ए. पी. चौगले, बदललेले कामगार कायदे आणि दक्षता यावर व्याख्यान होणार आहेत . तर त्याच दिवशी दुपारी ,श्री. विठ्ठल कोतेकर समृध्दीच्या मानसिकतेतून सर्वांगिण विकास यावर व्याख्यान होईल .
तर तिसऱ्या सत्रात,शनिवार दि. २० सप्टेंबर २०२५ सकाळी ९ वाजता शिबिरार्थी साखर कामगारांचे मनोगत होईल,केंद्र सरकारकडून साखर कारखाना व कामगारांबाबत वेळोवेळी कायद्यात बदल केले जात आहेत. या कायद्यांमुळे कामगारांत अस्वस्थता आहे. बदललेले कायदे, घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन व त्यावर करावयाच्या उपाययोजनांवर होणार आहे.
राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस, रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर होत आहे. शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार जयंत पाटील असणार आहेत. यावेळी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, प्रकाश राज्य साखर कारखाना संघाचे अध्यक्ष, पी. आर. पाटील, पृथ्वीराज जाचक, गणपतराव पाटील, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.सर्व कार्यक्रम पन्हाळा बस स्थानक मयूर उद्यान या ठिकाणी होतील.अशी माहिती कोषाध्यक्ष प्रदीप बनगे यांनी दिली.
साखर कामगार प्रतिनिधींचे पन्हाळा येथे शिबिर खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्याउद्घाटन
|