कृषी
अथणी शुगर्स येथील ऊसाच्या प्रायोगिक प्लॉटला ऊससंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञानची भेट
By nisha patil - 7/11/2025 1:48:09 PM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- अथणी शुगर्स तांबाळे कारखान्यामार्फत ऊसविकासाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. आधुनिक ऊस शेतीचे तंत्र शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचावे हाच उद्देश ठेऊन अथणी शुगर्स तांबाळेच्या ऊसविकास विभागामार्फत काम केले जात आहे.
मूलभूत ,पायाभूत व उन्नत ऊस बेण्याचा पुरवठा करणे, खते -औषधे पुरविणे तसेच ऊसपीक तज्ञाकडून शेतकऱ्यांना ऊसासंबंधि शास्त्रशुद्ध माहिती देण्याचे काम ऊसविकास विभागामार्फत केले जात आहे. याच अनुषंगाने जवळ जवळ 20 वेगवेगळ्या ऊस जातींचा प्रायोगिक ऊसप्लॉट वाघापूर येथे करण्यात आला आहे. या प्लॉटला ऊस संशोधन केंद्र कोईमतूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञानी भेट देऊन मार्गदर्शन केले.
अथणी शुगर्स तांबाळे युनिटतर्फे वाघापूर येथील प्रगतशील शेतकरी आनंदराव घोरपडे यांच्या ऊस प्लॉटमध्ये 20 वेगवेगळ्या प्रकारच्या ऊस जातींची लागण करून प्रायोगिक ऊस प्लॉट तयार करण्यात आला आहे. यामध्ये कोणत्या ऊस जातीपासून चांगले उत्पन्न मिळू शकते, कोणत्या रोग किडीला बळी पडतो, ऊसाची उंची जाडी, साखर उतारा, तुरे केंव्हा व किती प्रमाणात येतात, कितपत उत्पन्नात वाढ होते इ. बाबींचा अभ्यास केला जात आहे. त्याचप्रमाणे आपल्या भागात कोणत्या ऊस जाती लागण करणे योग्य आहेत याचाही अभ्यास केला जात आहे. असे मुख्यशेतीअधिकारी राजाराम आमते व इन्चार्ज ऊसविकास अधिकारी जनार्दन देसाई यांनी सांगितले. या प्रायोगिक ऊसप्लॉटला ऊस संशोधन केंद्र कोईमतूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कार्तिकेयन व डॉ. लक्ष्मीपती यांनी भेट देऊन आपल्या कार्यक्षेत्रात अधिक उत्पादन घेणेसाठी कोणती ऊसजात भविष्यामध्ये उपयोगी ठरेल याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी चीफ अकाउंटंट जमीर मकानदार, सुनील चांदेकर आदिजण उपस्थित होते.
अथणी शुगर्स येथील ऊसाच्या प्रायोगिक प्लॉटला ऊससंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञानची भेट
|