बातम्या
पहिल्याच मुसळधार पावसात उसाची पडझड; वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
By Administrator - 8/7/2026 8:03:58 PM
Share This News:
पहिल्याच मुसळधार पावसात उसाची पडझड; वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक भागांतील उभ्या उसाची मोठी पडझड झाली आहे. उन्हाळ्यात पाण्याचा तीव्र तुटवडा आणि मान्सून उशिरा दाखल झाल्याने उसाच्या मुळांची अपेक्षित वाढ झाली नव्हती. त्यामुळे पहिल्याच जोरदार पावसात अनेक शेतांतील ऊस आडवा पडल्याने
यंदा जानेवारीपासूनच तापमानात सातत्याने वाढ झाल्याने पिकांच्या पाण्याची गरज वाढली होती. मात्र जूनअखेरपर्यंत पुरेसा पाऊस न झाल्याने आणि सिंचनासाठीही मर्यादित पाणी उपलब्ध असल्याने उसाच्या मुळांची वाढ कमकुवत राहिली. गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी उसाची पिके जमिनीवर आडवी झाली आहेत.
सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्यास नुकसान आणखी वाढू शकते. त्यामुळे संबंधित कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
तारा न्यूज साठी प्रतिनिधी अजित बोडके
पहिल्याच मुसळधार पावसात उसाची पडझड; वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
|