बातम्या

ऊस दर न ठरवता गाळप सुरू; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Sugarcane crushing continues without fixing sugarcane price


By nisha patil - 10/28/2025 6:06:01 PM
Share This News:



ऊस दर न ठरवता गाळप सुरू; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

सातारा : जरंडेश्वर साखर कारखान्याने ऊस दर घोषित न करता गाळप हंगाम सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कारखान्याकडे जाणारी वाहतूक थांबवत संघटनेने “दर जाहीर करा, अन्यथा गाळ बंद पाडू” असा इशारा दिला आहे.

राज्य प्रवक्ते अनिल पवार म्हणाले, “सरकारकडून परवाना न घेता गाळप सुरू करणे हा नियमभंग आहे. शासनाने तात्काळ दर घोषित करून शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवावा.”

दरम्यान, सातारा–लातूर महामार्गावर ऊस वाहतुकीच्या वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून संघटनेने सरकारकडे ऊस दर तात्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.


ऊस दर न ठरवता गाळप सुरू; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
Total Views: 75