कृषी
आजरा साखर कारखान्यावर ऊस जातींचे संकरण बेणे प्लॉटची ऊस लागण
By nisha patil - 12/29/2025 6:50:08 PM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार) :- वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. पुणे यांच्या आंबोली नांगरतास येथील ऊस संशोधन केंद्रावर ज्या ऊस जातींना तुरा येत नाही. अशा ऊस जातींची कारखाना साईटवर लागवड करून त्यांना तुरा आले नंतर पुढील वर्षी त्यामधील नर-मादी ओळखून त्याचे संकर करून त्यापासून एक उन्नत जातीचे ऊस बेणे तयार करून त्याचा शेतकऱ्यांना उपयोग व्हावा.
आणि ऊसाचे उत्पन्न वाढावे यासाठी वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह.साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर प्रायोगिक तत्त्वावर बेणे प्लाॅट तयार करणेत आला आहे. हा बेणे प्लाॅट तयार करणेसाठी कारखान्याने स्वतःची जमीन दिलेली आहे. त्याचबरोबर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.नुकतेच या प्लाॅट मध्ये वेगवेगळ्या ९० जातींच्या बेण्यांची लागण करण्यात आलेली आहे. त्याचा शुभारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉ.कपील सुशिर व डॉ जे.एम. रेपाळे तसेच कारखान्याचे संचालक मधुकर देसाई, अनिल फडके, शिवाजी नांदवडेकर, रणजित देसाई, राजेन्द्र मुरकुटे, दिगंबर देसाई, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, मुख्य शेती अधिकारी विक्रमसिंह देसाई,ऊसपुरवठा अधिकारी अजित(राजू ) देसाई, शेती विभागचे हेड क्लार्क संदिप कांबळे आदिजण उपस्थित होते.
आजरा साखर कारखान्यावर ऊस जातींचे संकरण बेणे प्लॉटची ऊस लागण
|