बातम्या
ऊसदर चर्चेला निकाल नाही; जिल्हाधिकाऱ्यांचा कारखान्यांना इशारा!
By nisha patil - 5/11/2025 4:30:11 PM
Share This News:
ऊसदर चर्चेला निकाल नाही; जिल्हाधिकाऱ्यांचा कारखान्यांना इशारा!
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसदरावर तब्बल पावणेतीन तास चर्चा झाली, पण कोणताही तोडगा निघू शकला नाही.आता गुरुवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर या संदर्भात निर्णायक बैठक घेणार आहेत.
एफआरपीप्रमाणे पैसे न दिल्यास कारवाई होईल, असा इशारा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कारखान्यांना दिला.
ते म्हणाले, “मागील हंगामातील थकीत एफआरपी तातडीने द्या, आणि ऊस वजन काट्यांवर काटेकोर तपासणी होणार आहे.”
या बैठकीला पोलिस अधीक्षक, प्रादेशिक साखर सहसंचालक आणि सर्व कारखान्यांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या ठाम भूमिकेचे शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
ऊसदर चर्चेला निकाल नाही; जिल्हाधिकाऱ्यांचा कारखान्यांना इशारा!
|