बातम्या

आत्महत्या की हत्या? श्रद्धा अकॅडमीतील विद्यार्थ्याच्या मृत्यूमागे गंभीर आरोप

Suicide or murder


By nisha patil - 6/17/2025 9:29:35 PM
Share This News:



आत्महत्या की हत्या? श्रद्धा अकॅडमीतील विद्यार्थ्याच्या मृत्यूमागे गंभीर आरोप

 "मला इथून घेऊन जा" – आईला शेवटचा कॉल; यश जाधवच्या मृत्यूमागे संशयाचे धुके

 इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमी मध्ये शिकणाऱ्या व भंडारी हॉस्टेलमध्ये  राहत असलेल्या यश अजित जाधव (वय – १७), बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याने भंडारी होस्टेलमधील बाथरूममध्ये आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा गंभीर आरोप त्याचे वडील अजित जाधव यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यशने आत्महत्या करण्यापूर्वी आईला फोन करून "माझी अवस्था ठीक नाही, मला इथून घेऊन जा" असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, अकॅडमीतील त्रासाला कंटाळून  त्याने एकदा पलायन केल्याची ही माहिती समोर आली आहे.
मृत्यूनंतर अकॅडमी प्रशासनाकडून नातेवाईकांना माहिती देण्यात आली. नातेवाईकांनी मृतदेह इचलकरंजीत न नेता तो थेट कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात नेण्याची मागणी केली. यावेळी रुग्णालयाबाहेर यशच्या आई-वडिलांनी आक्रोश केला आणि श्रद्धा अकॅडमीविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न झाल्यास मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली.

ही घटना चलन गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, यशच्या मृत्यूमागचं सत्य काय आहे, यासाठी सखोल तपासाची मागणी केली जात आहे.


आत्महत्या की हत्या? श्रद्धा अकॅडमीतील विद्यार्थ्याच्या मृत्यूमागे गंभीर आरोप
Total Views: 133