बातम्या
सुळेरानजवळ मोटारसायकलचा अपघात
By nisha patil - 5/29/2026 2:17:12 PM
Share This News:
**सुळेरानजवळ मोटारसायकलचा अपघात*
**एक ठार तर एक जखमी*
आजरा(हसन तकीलदार)*- आजरा आंबोली मार्गावर सुळेरान नजीक काल गुरुवारी सायंकाळी मोटरसायकल घसरून मोठ्या दगडाला आदळल्याने मोटरसायकल वरील मेढेवाडी येथील शुभम पांडुरंग दळवी (वय वर्षे २६) हा तरुण जागीच ठार झाला तर मंगेश शिवराम पाटील (वय वर्षे २५ ) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याला खाजगी रुग्णालयात भरती केले आहे.या अपघातामध्ये मोटरसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शुभम आणि मंगेश हे दोघेजण पर्यटनासाठी कोकणामध्ये गेले होते. परत येत असताना मोटरसायकल घसरून दगडावर आपटली व दोघेही मोटरसायकलवरून बाजूला फेकले गेले. शुभमच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच मृत पावला असल्याचे सांगण्यात आले . तर मंगेश पाटील हा देखील गंभीर यांनी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला गडहिंग्लज येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असे समजते.
शुभमची परिस्थिती साधारण असून त्याची आई अंगणवाडी सेविका म्हणून काम करते तर तो स्वतः पोल्ट्रीच्या गाडीवर काम करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. मंगेश हा देखील एका खाजगी दुकानातील कामगार आहे.
रात्री उशिरापर्यंत पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.
सुळेरानजवळ मोटारसायकलचा अपघात
|