बातम्या

जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Summer training camp organized by District Sports Office


By nisha patil - 6/5/2026 11:07:41 AM
Share This News:



जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

 

जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने 11 ते 20 मे  या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडियम, कोल्हापूर येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दररोज सकाळी 6 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत चालणार आहे.

 

या शिबिरामध्ये योगा, ॲथलेटिक्स, व्हॉलीबॉल, कुस्ती, जलतरण, हॉकी, फुटबॉल, मल्लखांब, जिम्नॅस्टिक, ज्युदो, लाठी-काठी तसेच एरोबिक्स या विविध क्रीडा प्रकारांचे मूलभूत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रात्यक्षिकांसह खेळांचे कौशल्य शिकवून सराव घेतला जाणार आहे.

 

याशिवाय, खेळाडूंना आवश्यक असणाऱ्या आहारविषयक मार्गदर्शनासोबतच फिजिओथेरपी व प्रथमोपचार याबाबत तज्ञ व्यक्तींची व्याख्यानेही आयोजित करण्यात येणार आहेत. शिबिरासाठी 8 ते 16 वयोगटातील प्रथम नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून, सहभागी खेळाडूंना अल्पोपहार व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

 

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी स्टेडियम, कोल्हापूर येथे राज्य क्रीडा मार्गदर्शक रवीभूषण कुमठेकर, सीमा पाटील व अनिकेत बोडके यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.


जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
Total Views: 8