बातम्या
सुनिल दळवी यांचा पुरस्काराबद्दल सत्कार
By nisha patil - 5/26/2025 8:53:18 AM
Share This News:
सुनिल दळवी यांचा पुरस्काराबद्दल सत्कार
इचलकरंजी / प्रतिनिधी वाकीघोल (ता. राधानगरी)गावचे सुपूत्र व कोल्हापूर मध्यवर्ती एस.टी. कार्यालयातील लिपिक सुनिल गुंडू दळवी यांना महाराष्ट्र शासनाच्या राज्य कामगार कल्याण मंडळाच्यावतीने विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सुनिल दळवी हे राज्य शासनाच्या एसटी महामंडळात लिपिक पदावर कार्यरत आहेत.याशिवाय ते विविध सामाजिक उपक्रमात नेहमी अग्रेसर असतात.कोरोना व नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच नुकताच मुंबई येथे सुनिल दळवी यांना राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्यांचा वाकीघोल येथील विविध संस्था, संघटना आणि ग्रामस्थांच्यावतीने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुनिल दळवी यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल गौरवोद्गार काढून त्यांना मिळालेला विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार हा वाकीघोल गावच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारा असल्याचे सांगितले.यावेळी बार्शीचे मल्ल मतीन शेख यांनी सत्कारमुर्ती दळवी यांना चांदीची गदा भेट देवून त्यांचा सन्मान केला.
यावेळी उद्योगपती सर्जेराव पाटील, दिपक शेट्टी ,शाहीर रणजीत कांबळे ,पञकार अतुल जोशी , व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, उत्तम पाटील,दिग्विजय देसाई, दत्तात्रय कदम,उद्योगपती अभिजीत खतकर ,तुकाराम केसरकर, डॉमिनिक डिसोझा, बंडोपंत दळवी, आडोलीच्या सरपंच कमल सुतार, सावर्डेचे सरपंच तुकाराम यादव, चाफोडीचे सरपंच नारायण राणे, उमेश तेली, राजू ढोकरे, सागर पाटील, अरविंद नाईक,नवज्योत देसाई,बाबा नांदेकर आदींसह ऊर्जा परिवार सदस्य, ग्रामीण विकास संस्थेचे पदाधिकारी ,दळवी कुटूंबिय आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूञसंचालन व आभार प्रदर्शन रोहित शिंगे यांनी केले.
सुनिल दळवी यांचा पुरस्काराबद्दल सत्कार
|