बातम्या

पुणे पदवीधर मतदार संघासाठी सुनील मोदी यांची उमेदवारी जाहीर

Sunil Modis candidature announced for the Pune Graduate


By nisha patil - 10/10/2026 11:02:19 PM
Share This News:



पुणे पदवीधर मतदार संघासाठी सुनील मोदी यांची उमेदवारी जाहीर

प्रतिनिधी: अजित बोडके पुणे - आगामी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सुनील मोदी यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

यावेळी झालेल्या बैठकीत माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, नामदेव गिरी, संजय चौगुले, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख विशाल देवकुळे, मंजीत माने, जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, सुरज कांबळे, संदीप देवकुळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, पदवीधरांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुनील मोदी हे सक्षम उमेदवार असून सर्व शिवसैनिकांनी एकदिलाने काम करून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे.

उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.


पुणे पदवीधर मतदार संघासाठी सुनील मोदी यांची उमेदवारी जाहीर
Total Views: 40