बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त होत आहे — सुनील तटकरे
By nisha patil - 9/10/2025 11:22:43 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त होत आहे — सुनील तटकरे
मुंबई, दि. ९ : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा बळकट होत असल्याचे गौरवोद्गार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी काढले.
गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील आणि मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या प्रसंगी तटकरे म्हणाले, “कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा असून, मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे वैभव परत मिळवत आहे.”
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “पाटील आणि जमादार यांच्या प्रवेशामुळे पक्षाला बुलडोझर आणि जेसीबीचे बळ मिळाले आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी सर्वाधिक जागा जिंकेल.”
या कार्यक्रमाला आमदार शिवाजीराव गर्जे, लतीफ तांबोळी, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त होत आहे — सुनील तटकरे
|