विशेष बातम्या
शासनाच्या विविध योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा – सुनीता नेरलीकर
By nisha patil - 12/8/2025 4:15:52 PM
Share This News:
शासनाच्या विविध योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा – सुनीता नेरलीकर
कोल्हापूर : शासनाच्या विविध योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण अभियानाच्या सहाय्यक संचालिका सुनीता नेरलीकर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित विद्यार्थी जनजागृती अभियानांतर्गत आज झालेल्या कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. मानसिंग बोंद्रे यांनी या उपक्रमास मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमात महा ज्योतीचे समन्वयक भिकाजी कांबळे व सारथीचे समन्वयक दीपक चौगुले यांनी सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, पीआरटीआय या संस्थांकडून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध संधी व शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली. तसेच मुंबई, दिल्ली, पुणे, कोल्हापूर व इतर प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त नोंदणी करून स्पर्धा परीक्षांना सक्षमतेने सामोरे जाण्याचे आवाहन केले.
विद्यार्थी सहाय्यता जनजागृती समितीचे समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर यांनी स्वागत केले, डॉ. विजय देठे यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. एन. डी. काशीद पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाच्या विविध योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा – सुनीता नेरलीकर
|