राजकीय

रिंगरोड, सांडपाणी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्या

Support NCP to pave way for Ring Road Sewage Project


By nisha patil - 1/12/2025 11:38:34 AM
Share This News:



 गडहिंग्लज:- राज्यात आणि केंद्रात सत्ता नसलेल्या जनता दलाने गडहिंग्लज शहरात सत्ता भोगली. पण त्यांना शहराचा शाश्वत विकास करता आला नाही. यामुळे येथील रिंगरोड, कचरा, सांडपाणी व्यवस्थापन, खुल्या जागा सुशोभीकरण करणे, प्रॉपर्टीकार्ड चे प्रश्न मार्गी लावणे जमले नसून पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्ता द्या सर्व प्रश्न सोडवणार अशी आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
        शहरातील प्रभाग १० मध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुरबतमठ, नगरसेवक पदाचे उमेदवार विठ्ठल भमानगोळ, महिला उमेदवार आरती देवगोंडा यांच्या प्रचारातील संपर्क दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी उदय जोशी, सुरेश कोळकी यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीस शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, शहरातील अनेक प्रश्न गंभीर होत आहेत.

शहराचा विस्तार होत असल्याने कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, रिंगरोड, खुल्या जागा सुशोभीकरण करणे आणि पायाभूत सुविधा भक्कम करणे आदी कामाचा समावेश आहे. जनता दलाने सत्तेत असताना कोणतीही वैशिष्ट्यपूर्ण काम झालं नसल्याने या प्रश्न अधिक गंभीर होत असून यासाठी धोरणात्मक विकास करण्यासाठी आणि शहराला स्मार्ट बनवण्यासाठी पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन मंत्री मुश्रीफ यावेळी केले.
 यावेळी डॉ. किरण खोराटे, डॉ. बेनिता डायस, उदय जोशी, उमेदवार विठ्ठल भमानगोळ, आरती देवगोंडा यांची भाषणे झाली. यावेळी  अण्णासाहेब देवगोंडा, प्रकाश कारवालो, उदय कुरबेट्टी, संदीप कुरबेट्टी, प्रकाश लोहार, सुबराव मगदूम, सुरेश नारापगोळ, युवराज लोंढे, अक्षय घोटणे, प्रीतम वाळवेकर, सुनीता मोहिते, सुनम पोवार, अरविंद साळुंखे, दया कुपेकर, उदय देसाई  यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.


रिंगरोड, सांडपाणी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्या
Total Views: 22