बातम्या
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; ओबीसी संघटनेच्या लवकर सुनावणीच्या मागणीस नकार
By nisha patil - 10/27/2025 4:30:09 PM
Share This News:
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; ओबीसी संघटनेच्या लवकर सुनावणीच्या मागणीस नकार
आझाद मैदानातील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर काढलेल्या ‘कुणबी प्रमाणपत्र’ जीआरवरून निर्माण झालेल्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ओबीसी वेलफेअर असोसिएशनच्या लवकर सुनावणीच्या मागणीस नकार दिला, मात्र त्यांना स्वतंत्र अर्ज दाखल करण्याची मुभा दिली.
राज्य सरकारने ओबीसी संघटनेच्या मागणीला विरोध दर्शवला. या निर्णयानंतर दोन्ही समाजांच्या वकिलांनी परस्परविरोधी प्रतिक्रिया दिल्या.
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; ओबीसी संघटनेच्या लवकर सुनावणीच्या मागणीस नकार
|