ताज्या बातम्या
सुप्रिया सुळे यांचा सुनेत्रा पवारांना अचानक मेसेज; म्हणाल्या – “गेट वेल सून”
By nisha patil - 10/9/2025 4:42:37 PM
Share This News:
सुप्रिया सुळे यांचा सुनेत्रा पवारांना अचानक मेसेज; म्हणाल्या – “गेट वेल सून”
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी असल्याने त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मंगळवारी वरळी डोममधील महत्त्वाच्या बैठकीलाही ते अनुपस्थित होते.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना ‘गेट वेल सून’ असा मेसेज पाठवला असल्याची माहिती खुद्द सुळेंनी दिली. अजित पवारांना विश्रांती घ्यावी, असा सल्लाही त्यांनी या संदेशातून दिला.
सुळे म्हणाल्या, “मी सुनेत्रा वहिनींना मेसेज केला आहे, पण त्यांचा मला अद्याप प्रतिसाद आलेला नाही.”
सुप्रिया सुळे यांचा सुनेत्रा पवारांना अचानक मेसेज; म्हणाल्या – “गेट वेल सून”
|