राजकीय

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2026 साठी ‘सुराज्य संकल्प’ जाहीर; विनय कोरे यांची अभ्यासपूर्ण व पारदर्शक भूमिका

Surajya Sankalp announced for Kolhapur Municipal Corporation Election 2026 Vinay Kores insightful and transparent role


By Administrator - 11/1/2026 8:09:02 PM
Share This News:



कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती, RPI आठवले गट व RPI कवडे गट यांच्या वतीने ‘सुराज्य  संकल्प’ हा सर्वांगीण आणि पारदर्शक जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्याद्वारे शहराच्या मूलभूत गरजांपासून ते आर्थिक वृद्धीपर्यंत स्पष्ट व अभ्यासपूर्ण भूमिका मांडण्यात आली आहे.
जाहीरनाम्याचे प्रमुख सूत्र महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवणे हे असून, त्यातूनच शहराचा नियोजनबद्ध व शाश्वत विकास साधण्याचा मानस विनय कोरे यांनी व्यक्त केला. प्रदूषणमुक्त व कचरामुक्त कोल्हापूर, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिस्तबद्ध ट्रॅफिक व्यवस्था, तसेच हरित व स्वच्छ संस्कृती घडवण्यावर ‘सुराज्य  संकल्प’ मध्ये विशेष भर देण्यात आला आहे.
शहरातील लघुउद्योगांना चालना, पर्यटन वृद्धीतून रोजगार निर्मिती व आर्थिक विकास, आणि कोल्हापूरला व्यवसाय व रोजगाराचे नवे केंद्र म्हणून उभारण्याचा संकल्प जाहीरनाम्यात मांडण्यात आला आहे. आरोग्याच्या दृष्टीने शहरात आरोग्य केंद्रे, दवाखाने, खुली व्यायामस्थळे, पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी, हेल्थ कार्ड यांसारख्या सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
तसेच पंचगंगा नदी पूर नियंत्रण, महापालिका शाळांचे आधुनिकीकरण, कौशल्य विकास केंद्रे, ग्रंथालये, झोपडपट्टी पुनर्विकास आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता हा ‘सुराज्य  संकल्प’चा महत्त्वाचा भाग आहे. हरित, स्वच्छ व समृद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब असलेले शहर घडवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
हा जाहीरनामा केवळ आश्वासनांचा नसून, पूर्ण करण्याचा ठाम मानस असल्याचे विनय कोरे यांनी स्पष्ट केले. पारदर्शक प्रशासन, आर्थिक शिस्त आणि नागरिककेंद्रित विकास हाच ‘सुराज्य  संकल्प’चा आत्मा असल्याचे त्यांनी सांगितले.


कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2026 साठी ‘सुराज्य संकल्प’ जाहीर; विनय कोरे यांची अभ्यासपूर्ण व पारदर्शक भूमिका
Total Views: 52