बातम्या

*आजऱ्यात चोऱ्या व घरफोड्यांचे सत्र; पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

Surge in thefts and burglaries in Ajmer


By nisha patil - 11/25/2026 3:45:00 PM
Share This News:



*आजऱ्यात चोऱ्या व घरफोड्यांचे सत्र; पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
 

*आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे पोलीस निरीक्षकांना निवेदन
 

*आजरा(हसन तकीलदार): आजरा शहर व परिसरात चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिव कॉलनीतील प्रकाश नवनाथ शिंदे यांच्या घरातून लाखो रुपयांचे दागिने चोरीला जाणे, त्यानंतर बर्डे गल्ली येथे घरफोडी होणे, तसेच मिनर्व्हा हॉटेलसमोरील नेसरीकर यांच्या तांदूळ शॉपिंग सेंटरमधील दुकानांत वारंवार चोरीच्या घटना घडणे,काल परवा ए वन तांदूळ शॉपी मधून लाखोंचा तांदूळ व ड्राय फ्रुट माल लंपास अशा अनेक घरफोडी आणि चोरीच्या सत्रामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचप्रमाणे नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.या सर्व चोरीच्या घटनांचा तातडीने तपास करून आरोपींचा शोध घ्यावा, चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करावा व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.

तसेच शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलीस गस्त वाढवून नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करावे, अशी मागणी सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा प्रणीत अन्याय निवारण समितीच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे आजरा पोलीस ठाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर परशुराम बामणे ( अध्यक्ष तथा नगरसेवक), डॉ. सौ. स्मिता कुंभार (नगरसेविका), पांडुरंग सावरतकर (सचिव),  सुधीर कुंभार, बंडोपंत चव्हाण, दिनकर जाधव, संजय जोशी, जावेद पठाण, जोतीबा आजगेकर, सुभाष कांबळे, रविंद्र नेवरेकर, अनिस नेसरीकर, प्रकाश शिंदे, मुदस्सर मणेर आदी सदस्यांच्या सह्या आहेत.


*आजऱ्यात चोऱ्या व घरफोड्यांचे सत्र; पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
Total Views: 169