विशेष बातम्या
राजारामपुरी, शाहूनगर परिसरामध्ये 145 घरांचे सर्व्हेक्षण
By nisha patil - 5/26/2025 5:32:25 PM
Share This News:
राजारामपुरी, शाहूनगर परिसरामध्ये 145 घरांचे सर्व्हेक्षण
कोल्हापूर ता.26 : सद्या पावसाचा जोर वाढत असल्याने शहर परीसरामध्ये किटकजन्य व जलजन्य दुषित पाण्याचे आजाराचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या साथरोग विभागामार्फत आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून बाधित क्षेत्रांचे सर्व्हेक्षण सुरु केले आहे. यामध्ये प्रामुख्याने काविळ या आजाराचे रुग्ण शहर परीसरामध्ये काही भागात आढळत आहेत. या सर्व्हेक्षणामध्ये सोमवारी शाहुनगर चांदीचा गणपती या परिसरामध्ये 4 कावीळ रुग्ण आढळुन आले आहेत. या सर्वांनी खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतलेले असून हे सर्वजण बरे झाले आहेत. याचबरोबर या बाधीत क्षेत्रामध्ये साथरोग विभागामार्फत 145 घरांचे सर्व्हेक्षणे करण्यात आले आहे. यामध्ये 595 लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून या ठिकाणचे 10 पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
त्याचबरोबर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत शाहूनगर येथील परिसरात कुठेही पाण्याची मेन लाईन लिकेज आहे का याची तपासणी सुरु केली आहे. कावीळमध्ये रक्तातील बिलरुबीनचे प्रमाण वाढते असल्यामुळे त्वचा आणि डोळे पिवळे होणे ही प्रामुख्याने लक्षणे आहेत. तसेच गडद लघवी, थकवा, पोटदुखी, भुक न लागणे यासारखी लक्षणे दिसुन आल्यास त्यावरती वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य ते उपचार घेणे आवश्यक आहे. कावीळ ही एक समस्या असु शकते. परंतु योग्य वैद्यकीय उपचार आणि जीवनशैलीत बदल केलेस त्यावर नियंत्रण ठेवता येते. कावीळीची लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.
तरी नागरीकांनी घाबरुन न जाता स्वच्छतेची काळजी घेणे, पिण्याचे पाणी उकळुन गार करुन पिणे, नियमित व्यायाम करणे व निरोगी आहार घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
राजारामपुरी, शाहूनगर परिसरामध्ये 145 घरांचे सर्व्हेक्षण
|