राजकीय
आर. पी. आय. (गवई)पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी सूर्यकांत कांबळे
By nisha patil - 1/10/2025 11:14:03 AM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे नुकत्याच नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी विविध तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. यावेळी आजरा तालुक्याच्या अध्यक्षपदाची धुरा बुरुडे ता. आजरा येथील सूर्यकांत कांबळे यांचेकडे सोपवण्यात आली आहे.
कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे झालेल्या कार्यकर्ता मेळावा व सत्कार सोहळा समारंभात सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे (तात्या) यांचे हस्ते बुरुडे येथील सूर्यकांत बाळकु कांबळे यांना आजरा तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले.
या निवडीवेळी मनोगत व्यक्त करताना सूर्यकांत कांबळे म्हणाले की, मी सद्याच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखाधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालो आहे. आता पक्ष वाढीसाठी आणि पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी तसेच पक्षासाठी मला पूर्ण वेळ देता येणार आहे. या निवडीमध्ये जिल्हाकार्याध्यक्ष आर. एस. कांबळे आणि भुदरगड तालुकाध्यक्ष बबन कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल त्यांचे आभार मानले.
यावेळी पांडुरंग कांबळे (कोल्हापूर जिल्हाध्यक्ष), शिवाजी हिरवडेकर (जिल्हा चिटणीस ), सागर कांबळे (जिल्हाउपाध्यक्ष ), शशिकांत कांबळे (जिल्हा उपाध्यक्ष ), युवराज गायकवाड (मातंग आघाडी अध्यक्ष), यशवंत कांबळे, भाऊसाहेब काळे, पी. एस. कांबळे, भीमराव कांबळे, आर. एस. कांबळे, एस. के. कांबळे, त्याचबरोबर विविध तालुक्याचे पदाधिकारी तसेच महिला वर्ग उपस्थित होते.
आर. पी. आय. (गवई)पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी सूर्यकांत कांबळे
|