बातम्या

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक...!

Swabhimani Shetkari Sanghatana takes an aggressive stance


By nisha patil - 9/14/2026 8:51:13 PM
Share This News:



स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक...!
 

कागल प्रतिनिधी अजित बोडके  ऊस दर जाहीर न करताच श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स केनवडे यांनी आपला चालू गळीत हंगाम सुरू करण्यासाठीच्या हालचाली केलेल्या दिसताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखाना प्रशासन व चेअरमन यांच्याशी चर्चा करून प्रति टन पाच हजार रुपये जाहीर करूनच कारखाना सुरू करावा व ऊस परिषदेमध्ये दर संदर्भात जो तोडगा निघेल तो देणे बंधनकारक राहील अशा प्रकारचे निवेदन आज देण्यात आले. दर जाहीर न करता कारखाना सुरू केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल व  होणाऱ्या नुकसानीस कारखाना प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला.
 

  यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पोवार जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. बाळासाहेब पाटील,कोल्हापूर शहराध्यक्ष एडवोकेट संदीप चौगुले,जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील सर, जिल्हा सरचिटणीस नितेश कोगनोळे, तालुकाध्यक्ष नामदेवराव भराडे, तानाजी मगदूम, शिवाजी कासोटे, पांडुरंग चौगुले, तानाजी चौगुले करवीर तालुकाध्यक्ष बाजीराव पाटील,बाजीराव देवाळकर, संभाजीराव यादव, उत्तम बाबरे, शिवाजी कळमकर, राणोजी गोधडे, युवराज पवार, भानदास खोंद्रे, सुधाकर चौगुले, दत्तात्रय पाटील, उत्तम आवळेकर, सुनील पाटील, एकनाथ भराडे, रणजीत पाटील, अवधूत गायकवाड, अभिजीत पाटील व मोठ्या प्रमाणात शेतकरी ऊस उत्पादक उपस्थित होते. 

टीप चेअरमन संजयबाबा घाटगे यांनी संचालक मंडळाबरोबर चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ असे शिष्टमंडळास सांगितले.

 


स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक...!
Total Views: 30