बातम्या
स्वाभिमानीच्या शिलेदारांनी लोकगीतांतून केला ऊस परिषदेचा जागर
By nisha patil - 7/10/2026 11:29:48 PM
Share This News:
स्वाभिमानीच्या शिलेदारांनी लोकगीतांतून केला ऊस परिषदेचा जागर
कागल प्रतिनिधी - अजित बोडके -10 ऑक्टोबर रोजी विक्रमसिंह मैदान, जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऐतिहासिक रौप्य महोत्सवी 25 व्या ऊस परिषदेचे निमंत्रण देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी गावोगावी, वाडी-वस्तीवर जंग जंग पछाडत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून स्वाभिमानी युवा आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील (तिरपणकर) यांच्या लेखणीतून एक आगळे वेगळे जनजागृती गीत तयार करण्यात आले आहे. लोकशाहीर वामनराव कर्डक यांच्या गाजलेल्या 'फटं गाडी माझी म्हणू का' या गीताच्या चालीवर 'ही पांढरी साखर माझी म्हणू का' हे लोकगीत तयार करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे.
या लोकगीतातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा, साखर कारखानदारीतील लूट आणि स्वाभिमानीच्या लढ्याचा इतिहास अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. गावागावात हे गीत सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष सादरीकरणातून पोहोचवले जात असून शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
यंदाची 25 वी ऊस परिषद नक्कीच ऐतिहासिक होणार असा विश्वास यावेळी सर्व शिलेदारांनी व्यक्त केला.
या जनजागृती मोहिमेत सहभागी कलाकार -
शाहीर विक्रम पाटील, डॉ. बाळासाहेब पाटील, ॲड. संदीप चौगुले, नितेश कोगनोळे, राहुल दिगंबरे, बाजीराव पाटील दोनवडेकर, बाजीराव पाटील देवाळकर, पांडूरंग शिंदे, राजू पाटील, रंगराव कळके, सुनील कापडे, अर्जुन पाटील आदी.
स्वाभिमानीच्या शिलेदारांनी लोकगीतांतून केला ऊस परिषदेचा जागर
|