बातम्या
जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानींचा मेळावा; २४ व्या ऊस परिषदेची तारीख होणार जाहीर
By nisha patil - 9/22/2025 9:40:06 PM
Share This News:
जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानींचा मेळावा; २४ व्या ऊस परिषदेची तारीख होणार जाहीर
जयसिंगपूर (प्रतिनिधी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने २४ व्या ऊस परिषदेच्या रणशिंगाची सुरुवात करण्यासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता जयसिंगपूर-उदगाव रोडवरील कल्पवृक्ष गार्डन येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी मार्गदर्शन करणार असून, यावेळी २४ व्या ऊस परिषदेची तारीख जाहीर केली जाणार आहे.
दरम्यान, पुढील आठवड्यात राज्य सरकारच्यावतीने ऊस गळीत हंगामाबाबत मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय होण्याची अपेक्षा आहे. शेजारील कर्नाटक राज्यात कारखाने १० ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने महाराष्ट्रातील शेतकरीही उत्सुक आहेत.
यंदाच्या ऊस हंगामासाठी आंदोलनाची दिशा आणि भूमिका ठरवण्यासाठी आयोजित या बैठकीस सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे. २५ तारखेला होणाऱ्या बैठकीनंतर जाहीर होणाऱ्या ऊस परिषदेच्या तारखेकडे राज्यासह सीमाभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानींचा मेळावा; २४ व्या ऊस परिषदेची तारीख होणार जाहीर
|