बातम्या

आजरा साखर ची वाहने स्वाभिमानी ने रोखली.. कारखान्याची सकारात्मक भूमिका

Swabhimani stopped the vehicles of Ajra Sugar


By nisha patil - 7/11/2025 1:45:36 PM
Share This News:



 

आजरा(हसन तकीलदार):- आजारा साखर  कारखान्याने गतवर्षीची थकीत एफ. आर. पी. ची रक्कम 1कोटी 95 लाख रुपये , सन 2022-23चा 50 /-रू चा थकीत  हप्ता आणि चालु हंगामाच्या ऊसाची पहिली ऊचल 3751 रू. जाहिर  करावी यासाठी  स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचे वतीने  आजरा टोल नाक्याजवळ कारखान्याची वाहने अडवण्यात आली  त्याचवेळी कारखान्याचे संचालक मंडळ  टोलनाक्यावर हजर झाले आणि संचालक  आणी  स्वाभिमानी चे पदाधिकारी  यांची टोलनाक्यावर बैठक  सुरू झाली. यात सकारात्मक निर्णय झाली.
    स्वाभिमानीचे जिल्हा  उपाध्यक्ष  तानाजी देसाई  यानी स्वागत करून आजरा कारखान्या कडुन मागील  हंगामातील  थकीत  एफ. आर.पी. चा , सन 2022-23 चा थकीत  50/- रू चा हप्ता  आणी  या वर्षी चा पहिला हप्ता जाहिर  करावा त्याशिवाय  हंगाम  सुरू  करता येणार नाही हे स्पष्ट  केले 
राजेंद्र गड्ड्यानवार  यांनी राज्य सरकारच्या  एक रकमी एफ.आर.पी. चे तीन तुकडे करण्याच्या विरोधात राजु  शेट्टी  हे उच्च  न्यायालयात जाऊन तो शासनाचा तीन तुकड्याचा जी.आर. रद्द करून पुर्वीच्या कायद्यानुसार एक रकमी एफ. आर.पी. शेतकऱ्यांना  देणेचा निर्णय  शेतकऱ्यांच्या  बाजूने  मिळवण्यात यशस्वी  झाले त्यानुसार तुम्हाला  ती रक्कम  द्यावी लागेल अन्यथा  साखर जप्ती आणी  संचालकावर फौजदारी  गुन्हा  दाखल करून  घेणेची नामुष्की  तुम्ही  ओढवुन घेऊ नका असा थेट इशारा संचालकाना दिला.
यावर कारखान्याची बाजु मांडताना व्हा.चेअरमन  सुभाष  देसाई  यांनी  स्वाभिमानीची मागणी रास्त असुन थकीत  एफ.आर. पी. 1कोटी  95 लाख  रु.15 नोव्हेंबर पुर्वी देतो याबाबतचे लेखी पत्र देतो आणि  सन 2022-23चा थकीत  50/-₹चा हप्ता  संचालक  मंडळाची मिटिंगला त्याबाबत  सकारात्मक  निर्णय  घेतो याबाबतचेही लेखी हमी आपण देत आहे आणि  चालु वर्षीच्या पहिल्या  ऊचली संदर्भात लवकरच भुमीका  जाहीर  करू असे वचन देतो असे सांगितले.तर वसंतराव धुरे यांनी ही कारखान्याची सकारात्मक  भुमीका  असल्याचे स्पष्ट  केले.
कारखान्याच्या  लेखी हमीपत्राच्या आधारावर व सकारात्मक तोडगा निघाल्याने स्वाभिमानीने आंदोलन  स्थगीत केले यावेळी  संघटनेचे संजय देसाई, सखाराम केसरकर, सुभाष पाटील, धनाजी  पाटील, निवृत्ती कांबळे, बसु मुत्नाळे,दिपक पाटील,सुरेश  शिंगटे,नरेंद्र कुलकर्णी, काशीनाथ भादवणकर, गंगाराम डेळेकर, बबन बार्देस्कर, पांडुरंग  सावंत, तर कारखान्याचे उदयराज पवार,वसंतराव धुरे,विष्णूपंत केसरकर ,दिगंबर देसाई, रणजित देसाई, शिवाजी नांदवडेकर ,कार्यकारी संचालक संभाजी सावंत, मुख्यशेतीअधिकारी विक्रमसिंह देसाई तसेच संचालक आधिकारी आणि  संघटनेचे कार्यकर्ते  उपस्थित होते.


आजरा साखर ची वाहने स्वाभिमानी ने रोखली.. कारखान्याची सकारात्मक भूमिका
Total Views: 39