बातम्या
कसबा बावडा सेवा रुग्णालयात जागतिक स्वमग्नता जागृकता दिवस
By nisha patil - 3/4/2026 11:31:03 AM
Share This News:
**कसबा बावडा सेवा रुग्णालयात जागतिक स्वमग्नता जागृकता दिवस*
**आजरा (हसन तकीलदार)**:-सेवा रुग्णालय कसबा बावडा, कोल्हापूर या ठिकाणी जिल्हा शिघ्र हस्तक्षेप केंद्र, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व कोल्हापूर पिडीयाट्रिक असोसिएशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वमग्न मुलांचे निदान व उपचार पद्धती यासंदर्भात आर बी एस के पथक , डी इ आय सी अधिकारी,कर्मचारी व सेवा रुग्णालयीन स्टाफ यांना डॉ.काश्मिरी बडबडे(Developmental & Behaviral Peditrician)यांचे मार्फत स्वमग्न लक्षणे ,त्यांचे उपचार याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले व उपस्थित सर्व आरबीएसके वैद्यकीय अधिकारी यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्तेही स्वमग्नते संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सरिता थोरात होत्या व कोल्हापूर बालरोग संघटना अध्यक्ष डॉ.विजय गावडे,
कोल्हापूर बालरोग संघटना सचिव डॉ.मिलींद सदावर्ते, कोल्हापूर बालरोग संघटना सहसचिव डॉ.भूषण मिरजे हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाकरीता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रशांत वाडीकर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.
तसेच वैद्यकीय अधिक्षक डॉ. निलिमा पाटील , डी इ आय सी बालरोग तज्ञ डॉ.बाबासाहेब थोरात , वैद्यकीय अधिकारी डॉ.आगतराव यादव सेवा रुग्णालय बालरोग तज्ञ डॉ.अजय शिंदे, व्यवस्थापक मनोरमा सुंजी व सर्व डी इ आय सी स्टाफ व सर्व आर बी एस के स्टाफ यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम यशस्वी होण्यास सहकार्य केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ.बाबासाहेब थोरात यांनी केले व आभार प्रदर्शन विशेष शिक्षक तज्ञ मानसिंग ज्वारे यांनी केले.
कसबा बावडा सेवा रुग्णालयात जागतिक स्वमग्नता जागृकता दिवस
|