शैक्षणिक
श्री. स्वामी विवेकानंदचे सीईओ कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते मेडिकल बँक लोकार्पण सोहळा संपन्न...
By nisha patil - 6/14/2025 3:03:47 PM
Share This News:
श्री. स्वामी विवेकानंदचे सीईओ कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते मेडिकल बँक लोकार्पण सोहळा संपन्न...
कुंडल (ता. कडेगाव) – आज शुक्रवार, दिनांक १३ जून २०२५ रोजी क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, कुंडल येथे गरजू आणि economically weaker घटकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या “मेडिकल बँक” या आरोग्यविषयक उपक्रमाचे लोकार्पण उत्साहात पार पडले.
या उपक्रमाचे उद्घाटन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय कौस्तुभजी शुभांगी मुरलीधर गावडे (साहेब) यांच्या शुभहस्ते झाले. यामध्ये समाजातील गरजू, गरीब नागरिकांसाठी सर्व आरोग्यविषयक सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, ही या उपक्रमाची विशेष बाब आहे.
कार्यक्रमात बोलताना कौस्तुभ गावडे साहेबांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड यांच्यातील मैत्री आणि सामाजिक बांधिलकी यांचा उल्लेख करत भावनिक आठवणींना उजाळा दिला.
या प्रसंगी पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार आदरणीय अरुण लाड (अण्णा) यांच्या हस्ते कौस्तुभ गावडे साहेबांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय श्री. शरद लाड (भाऊ), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडेगाव तालुका अध्यक्ष जयदीप यादव (काका), राजेश पोळ यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही वैद्यकीय बँक ग्रामीण भागात आरोग्यसेवेच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार असून, सामाजिक सहकार्याचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरते, असे मत यावेळी विविध मान्यवरांनी व्यक्त केले.
श्री. स्वामी विवेकानंदचे सीईओ कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते मेडिकल बँक लोकार्पण सोहळा संपन्न...
|