शैक्षणिक
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलमध्ये स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाचा उत्साहात प्रारंभ
By nisha patil - 12/1/2026 12:49:29 PM
Share This News:
कोल्हापुर बुधवार पेठ येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलमध्ये स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व ग्रंथदिंडी, तर माजी मुख्याध्यापक अजित मोहिते यांच्या हस्ते प्रभात फेरीचे उद्घाटन झाले.
विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी, चित्ररथ, घोषणांसह भव्य प्रभात फेरी काढली. शिवाजी चौकात लेझीम, तलवारबाजी व लाठीकाठीची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्राथमिक विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. मंजिरी कुलकर्णी यांनी वॉटर प्युरिफायरसाठी ३० हजार रुपयांची देणगी दिली.
यावेळी गुरुदत्त म्हाडदूत, ओंकार व्हनारसे, निखिल जाधव, आदिनाथ टकळे, गोविंद काणे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, मुख्याध्यापक बी.जे. सावंत, प्राथमिक मुख्याध्यापक एस.व्ही. पोवार, कॉलेज विभाग प्रमुख सौ. विद्या पाटील, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन ए.के. कांबळे यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलमध्ये स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाचा उत्साहात प्रारंभ
|