बातम्या
स्वरा पाटीलच्या वाढदिवसाला ऐतिहासिक ठसा...
By nisha patil - 9/24/2025 5:51:44 PM
Share This News:
स्वरा पाटीलच्या वाढदिवसाला ऐतिहासिक ठसा...
कणेरीत शिवकालीन शस्त्र-नाण्यांचे भव्य प्रदर्शन संपन्न
केंद्रीय प्राथमिक शाळा, कणेरी येथे शिवकालीन शस्त्रे, नाणी व पुरातन वस्तूंचे भव्य प्रदर्शन उत्साहात पार पडले. चि. स्वररा (कु. सुवर्णा व संग्राम शिवाजीराव पाटील, पोलीस पाटील कणेरी यांची सुपुत्री) हिच्या ९ व्या वाढदिवसानिमित्त हा आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीमती टी. जे. मगदूम (सहाय्यक पोलीस निरीक्षक, गोकुळ शिरगाव) यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी शंभर मध्ये. अर्चना पाथरे होत्या. यावेळी संचालक शिवाजीराव शंकर पाटील, सरपंच निशांत गिरीधर पाटील, केंद्रप्रमुख संभाजी लोहार आदी मान्यवर उपस्थित होते.
संग्राहक अमरसिंह मारुती पाटील-सोनगेकर यांनी प्रदर्शनासाठी मौल्यवान वस्तू उपलब्ध करून दिल्या. राजे ग्रुप, कणेरी व शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमाला पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला बचत गट व तरुण मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्वरा पाटीलच्या वाढदिवसाला ऐतिहासिक ठसा...
|