ताज्या बातम्या
लाडकी बहिणींना दिवाळीचा गोडवा! दोन हप्त्यांचा एकत्र तीन हजारांचा लाभ
By nisha patil - 7/10/2025 5:15:56 PM
Share This News:
लाडकी बहिणींना दिवाळीचा गोडवा! दोन हप्त्यांचा एकत्र तीन हजारांचा लाभ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा — लाडकी बहीण योजना कायम, हप्ते उद्यापासून खात्यात
राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. या योजनेअंतर्गत दोन हप्त्यांचे एकत्रित तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. यामध्ये दिवाळीपूर्वीचा १५०० रुपयांचा बोनस हप्ता आणि नियमित १५०० रुपयांचा मासिक हप्ता एकत्र देण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात स्पष्ट केले की, “लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही.” तसेच उद्यापासून राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये हप्ते जमा करण्यास सुरुवात होईल, आणि पुढील तीन दिवसांत सर्व लाभार्थींना पैसे मिळतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
या घोषणेने दिवाळीपूर्वी लाखो महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्यातील महिलांना आर्थिक आधार मिळत असून, या योजनेचा लाभ नियमित सुरूच राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
लाडकी बहिणींना दिवाळीचा गोडवा! दोन हप्त्यांचा एकत्र तीन हजारांचा लाभ
|