बातम्या

टीबीमुक्त भारत अभियानाला दोडामार्गातून बळ; लोकप्रतिनिधींनी टीबी रुग्ण दत्तक घेतले

TB free India campaign gets a boost from Dodamarg


By Administrator - 6/7/2026 1:15:38 PM
Share This News:



टीबीमुक्त भारत अभियानाला दोडामार्गातून बळ; लोकप्रतिनिधींनी टीबी रुग्ण दत्तक घेतले

दोडामार्ग : शुभम गवस राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘टीबी मुक्त भारत अभियानाला’ दोडामार्ग तालुक्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती व सदस्यांनी तालुक्यातील टीबी रुग्णांना पुढील सहा महिन्यांसाठी दत्तक घेत त्यांच्या पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली आहे.
 

‘निक्षय मित्र’ अभियानांतर्गत रुग्णांना औषधोपचारांसोबत सकस आहार मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पंचायत समितीच्या सभापती सौ. पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस तसेच सदस्य सौ. स्नेहा गवस, संजय सातार्डेकर, सौ. सोनिया कुबल आणि सौ. सायली निंबाळकर यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
 

या सामाजिक उपक्रमाबद्दल तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाने लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत. त्यांच्या या पुढाकारामुळे टीबीमुक्त भारत अभियानाला बळ मिळाले असून समाजातील इतर घटकांनीही ‘निक्षय मित्र’ म्हणून पुढे यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.


टीबीमुक्त भारत अभियानाला दोडामार्गातून बळ; लोकप्रतिनिधींनी टीबी रुग्ण दत्तक घेतले
Total Views: 13