बातम्या
टीईटी निर्णय अन्यायकारक; केंद्राने हस्तक्षेप करून पुनर्यचिका दाखल करावी – खा.धैर्यशील माने
By nisha patil - 5/12/2025 4:15:18 PM
Share This News:
टीईटी निर्णय अन्यायकारक; केंद्राने हस्तक्षेप करून पुनर्यचिका दाखल करावी – खा.धैर्यशील माने
लाखो कार्यरत शिक्षकांवरची अनिश्चितता वाढली;
टीईटी संबंधित घेतलेल्या अलीकडील निर्णयामुळे देशभरातील कार्यरत शिक्षकांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेचा मुद्दा शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी आज दिल्लीतील हिवाळी अधिवेशनात जोरदारपणे मांडला. या निर्णयामुळे लाखो शिक्षकांच्या नोकरीवर अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली असून हा निर्णय “अन्यायकारक” असल्याची ठाम भूमिका त्यांनी सभागृहात नोंदवली.
खासदार माने म्हणाले की, कार्यरत शिक्षकांनी अनेक वर्षे सेवा बजावली असून अशा निर्णयामुळे त्यांच्या भवितव्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने या प्रश्नात हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, केंद्र सरकारमार्फत न्यायालयात पुनरयाचिका दाखल करून शिक्षकांचे हक्क व भविष्य सुरक्षित केले जावे, अशीही त्यांनी स्पष्ट मागणी केली. देशभरातील शिक्षकांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी केंद्राने त्वरित पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या मागणीमुळे टीईटी प्रकरणाने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर चर्चा रंगली आहे.
टीईटी निर्णय अन्यायकारक; केंद्राने हस्तक्षेप करून पुनर्यचिका दाखल करावी – खा.धैर्यशील माने
|