बातम्या

टीईटी परीक्षा नोव्हेंबरमध्ये; अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार

TET exam in November


By nisha patil - 12/9/2025 4:23:42 PM
Share This News:



टीईटी परीक्षा नोव्हेंबरमध्ये; अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार

राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्याची तयारी जोरात सुरू झाली आहे. येत्या 23 नोव्हेंबर रोजी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणार असल्याची माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे.

प्राथमिक (इयत्ता 1 ते 5) आणि माध्यमिक (इयत्ता 6 ते 8) शाळांमधील शिक्षकपदासाठी टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. अर्ज उमेदवारांना ऑनलाइन भरावे लागणार असून, अर्ज प्रक्रियेत कोणतीही चूक होऊ नये यासाठी परिषद विशेष काळजी घेत आहे.

अर्ज भरण्यापासून ते परीक्षेपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असून, उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


टीईटी परीक्षा नोव्हेंबरमध्ये; अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार
Total Views: 100