शैक्षणिक
प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य
By nisha patil - 3/9/2025 11:22:22 AM
Share This News:
प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य – सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल”
"शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे मोठा निकाल. सेवेत राहायचं असेल किंवा पदोन्नती घ्यायची असेल, तर आता टीईटी पास करणे अनिवार्य ठरणार आहे."
"सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांना आता दोन वर्षांच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. पाच वर्षांपेक्षा कमी सेवा शिल्लक असलेले शिक्षक मात्र टीईटी न देता सेवेत राहू शकतील, पण त्यांना पदोन्नती मिळणार नाही. पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा उरलेले शिक्षक जर टीईटी पास झाले नाहीत, तर त्यांना जबरदस्ती निवृत्ती घ्यावी लागेल. अल्पसंख्याक शाळांवरील निर्णय मात्र मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्यात आला आहे. या निकालामुळे हजारो शिक्षकांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, राज्य सरकारांनी त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे."
"टीईटी बंधनकारक करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या या आदेशामुळे शिक्षकांची गुणवत्ता वाढेल का? की सेवेत असलेल्या शिक्षकांवर अन्याय होईल? हेच आता मोठं प्रश्न आहे.
प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य
|