बातम्या

टीईटी पेपर फुटीचा प्रयत्न उधळला; मुरगुड पोलिसांची मोठी कारवाई

TET paper leak attempt foiled


By nisha patil - 11/23/2025 4:49:12 PM
Share This News:



टीईटी पेपर फुटीचा प्रयत्न उधळला; मुरगुड पोलिसांची मोठी कारवाई

राज्यभरात सुरू असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पार्श्वभूमीवर पेपर फुटीचा गंभीर प्रयत्न उधळण्यात मुरगुड पोलिसांना यश मिळाले आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या मदतीने कागल तालुक्यातील सोनगे गावातून नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले असून प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे प्राथमिक संकेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीबाबत पोलिसांना आधीच माहिती मिळाली होती. त्यानुसार शनिवारी सायंकाळपासून पोलीस गोपनीय तपासात होते. अखेर रविवारी मध्यरात्री छापा टाकून या टोळीला जेरबंद करण्यात आले. ताब्यात घेतलेल्यांमध्ये काही शिक्षक परीक्षार्थींचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. हे संशयित मुख्यत्वे कागल व राधानगरी तालुक्यातील आहेत.

दरम्यान, आज राज्यभरात लाखो उमेदवार टीईटी परीक्षा देत असताना कोल्हापुरातच पेपर फोडीचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून तपास जलदगतीने सुरू आहे.

 


टीईटी पेपर फुटीचा प्रयत्न उधळला; मुरगुड पोलिसांची मोठी कारवाई
Total Views: 31