बातम्या
धोकादायक इमारतींवर तात्काळ कारवाई करा – अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांचे निर्देश
By nisha patil - 5/26/2025 11:15:07 PM
Share This News:
धोकादायक इमारतींवर तात्काळ कारवाई करा – अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांचे निर्देश
कोल्हापूर, ता. २६ : कोल्हापुरात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सज्ज ठेवण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी दिल्या. हवामान विभागाने गुरुवारपर्यंत रेड अलर्ट जाहीर केल्याने संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.
बैठकीत रोकडे यांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना:
-
धोकादायक इमारतींना नोटीसा देऊन त्यावर त्वरित कारवाई करा.
-
निवारा केंद्रांची पाहणी करून लाईट, पाणी व इतर सुविधा तपासा.
-
पर्यायी निवाऱ्यांसाठी मंगल कार्यालयांची यादी तयार करा.
-
मुख्य रस्ते व चौकांमध्ये पॅचवर्कचे नियोजन करून तयार राहा.
-
पाणी पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी विभागांनी दैनंदिन पाहणी करून अहवाल सादर करावा.
-
शिंगणापूर योजना १० जूनपूर्वी कार्यान्वित करा.
-
नाल्यांची व चॅनेलची सफाई करून त्याचा अहवाल सादर करा.
-
वादळात कोसळलेले वृक्ष उचलण्यासाठी चार पथकांची नियुक्ती करा.
-
डेंग्यू प्रतिबंधासाठी जनजागृती, तसेच साचलेले पाणी, कंटेनर व टायरची विल्हेवाट लावा.
-
धोकादायक पोल, होर्डिंग्ज यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा.
-
पूरप्रवण भागातील हॉस्पिटल्स स्थलांतरासाठी नोटीसा द्या.
-
ओढे व नाल्यांवरील अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करा, फक्त नोटीस देऊन थांबू नका.
-
प्रमुख चौक व रस्त्यांवरील अतिक्रमण, केबिन्स जप्त करण्याचे आदेश.
बैठकीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, आरोग्य व जल विभागाचे अधिकारी, अग्निशमन व अन्य संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पूर आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज असून, नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धोकादायक इमारतींवर तात्काळ कारवाई करा – अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांचे निर्देश
|