बातम्या

एस.टी. बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लंपास; महिला चोरटी जेरबंद!

Taking advantage of the crowd


By nisha patil - 11/23/2026 11:01:54 PM
Share This News:



एस.टी. बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लंपास; महिला चोरटी जेरबंद!

 कोल्हापुरात एस.टी. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने आणि पैसे चोरणाऱ्या रेकॉर्डवरील महिला चोरटीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. प्रिया शरद चौगुले असे अटक करण्यात आलेल्या ४० वर्षीय महिलेचे नाव आहे. १६ नोव्हेंबर रोजी तावडे हॉटेल बसस्थानकावर सुनिता कुकडे या इचलकरंजीला जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये चढत असताना त्यांच्या पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या चोरीचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे संशयित महिलेचा माग काढला. अतिग्रे येथील हॉटेल एक्सलसमोर सापळा रचून प्रिया चौगुले हिला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, असा तब्बल २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली.


एस.टी. बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लंपास; महिला चोरटी जेरबंद!
Total Views: 4