बातम्या

रंकाळा स्टँडवर गर्दीचा फायदा घेत दागिने लंपास; सराईत महिला चोरटी पोलिसांच्या जाळ्यात!

Taking advantage of the crowd at Rankala stand


By nisha patil - 11/13/2026 7:45:15 PM
Share This News:



रंकाळा स्टँडवर गर्दीचा फायदा घेत दागिने लंपास; सराईत महिला चोरटी पोलिसांच्या जाळ्यात!

रंकाळा स्टँडवर गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधील दागिने आणि रोकड चोरणाऱ्या सराईत महिला चोरटीला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीजेसाठी एसटीने प्रवासाला निघालेल्या  विनीता शिवाजी गायकवाड या रंकाळा स्टँडवर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. पोलीस अंमलदार अनिकेत मोरे यांना मिळालेल्या माहितीवरून वाय. पी. पोवार नगर चौकात सापळा रचून मंदा संतोष लोंढे या महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून अर्धा तोळ्याची सोन्याची चेन आणि ३ हजार ५०० रुपये रोख असा एकूण ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


रंकाळा स्टँडवर गर्दीचा फायदा घेत दागिने लंपास; सराईत महिला चोरटी पोलिसांच्या जाळ्यात!
Total Views: 19