बातम्या
गुणवंत विद्यार्थी शाळेसह गावाचे ब्रँड अँबेसेडर – सुहासिनीदेवी घाटगे
By Administrator - 6/27/2025 4:19:22 PM
Share This News:
गुणवंत विद्यार्थी शाळेसह गावाचे ब्रँड अँबेसेडर – सुहासिनीदेवी घाटगे जयसिंगराव घाटगे प्रशालेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कागल (प्रतिनिधी) – "गुणवंत विद्यार्थी हे शाळेसह गावाचे ब्रँड अँबेसेडर असतात. त्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणात यश मिळवून शाळेचे आणि गावाचे नाव उंचावावे," असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.
श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. कार्यक्रमाचे आयोजन दि कागल सीनिअर एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट व श्री छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ यांनी संयुक्तपणे केले होते.
श्रीमती घाटगे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी संस्थेची स्थापना केली. त्यांची प्रेरणा जपत ट्रस्टकडून विविध प्रोत्साहन योजनांद्वारे विद्यार्थ्यांना पाठबळ दिले जाते.
यावेळी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या अनुष्का डकरे हिचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक सचिन मगदूम, संजय नरके, युवराज पसारे, कर्नल डी.एस. मंडलिक आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक एस.डी. खोत यांनी स्वागत केले, सूत्रसंचालन सौ. जे.यू. पाटील व सौ. ए.एस. पाटील यांनी केले, तर आभार सौ. एस.बी. सासमिले यांनी मानले.
गुणवंत विद्यार्थी शाळेसह गावाचे ब्रँड अँबेसेडर – सुहासिनीदेवी घाटगे
|